दिवाळीचा फराळ थेट परदेशात; डाक विभागाची २४ तास पार्सल सेवा सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिवाळीनिमित्त घरगुती फराळ आणि भेटवस्तू देश-विदेशात पाठवण्यासाठी भारतीय डाक विभागाने कराड आणि साताऱ्यात २४ तास पार्सल बुकिंग सेवा सुरू केली आहे.

स्थैर्य, कराड, दि. २८ ऑक्टोबर : दिवाळीनिमित्त आप्तस्वकीयांना फराळ आणि भेटवस्तू पाठवण्यासाठी भारतीय डाक विभागाने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी कराड आणि सातारा येथे २४ तास पार्सल बुकिंगची विशेष सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती कराड विभागाच्या डाक अधीक्षकांनी दिली आहे.

देश-विदेशात सुरक्षित पार्सल सेवा

महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये आणि परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना घरगुती फराळ पाठवण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येणार आहे. आंतरराष्ट्रीय पार्सल बुक करताना संबंधित देशाचे आयात नियम आणि खाद्यपदार्थ पाठवण्यावरील निर्बंधांची अगोदर माहिती घेऊनच पार्सल बुक करणे आवश्यक असणार आहे.

व्यावसायिक व बचत गटांना मोठी संधी

दिवाळीच्या काळात पार्सल पाठवण्यासाठी होणारी गर्दी आणि वेळेची अडचण लक्षात घेऊन सातारा सॉर्टिंग पोस्ट ऑफिस आणि कराड येथे २४ तास बुकिंग सुविधा देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांसह व्यापारी, गृहउद्योग चालक, फराळ उत्पादक आणि महिला बचत गटांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!