दैनिक स्थैर्य | दि. ४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणजे काय? तर त्याचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाची पिढी तयार करणे, हे होय.
ही पिढी तयार होताना आज डोळ्यांनी पाहिले. फलटण शहरात सकाळी ठीक ९ वाजता काही मुलांना महाराजांसमोर प्रेरणा मंत्र घेताना पाहिले. त्यांना जाऊन विचारले, काय करताय? ती मुलं बोलली की, आमचे पेपर चालू आहेत, महाराजांकडून आशिर्वाद घेऊन पेपरसाठी चाललो आहे. त्यांच्या उत्तराने ‘शिवबा विना न दुसरा बलशाली मंत्र’ हे समजले.