कंटेनमेंट झोन म्हणजे काय ?; कंटेनमेंट झोनमध्ये काय करावं ?; फलटण शहरात प्रमुख ठिकाणी तर तालुक्यातील सहा गावे कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित


स्थैर्य, फलटण, दि. २९ : फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी शहरात काही प्रमुख ठिकाणी व तालुक्यातील सहा गावांमध्ये कंटेनमेंट झोन (Containment Zone) घोषित केलेले आहेत. फलटण शहरामध्ये डी. एड. कॉलेज चौक, उमाजी नाईक चौक व महाराजा मंगल कार्यालय येथे कंटेनमेंट झोन (Containment Zone) घोषित केलेले आहेत. तर फलटण तालुक्यामध्ये कोळकी, साखरवाडी, जाधववाडी, वाठार निं., जोरगाव झिरपवाडी हि गावे कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. जवळपास एक वर्षाने पुन्हा संपूर्ण गावच्या गाव बंद करण्याचा निर्णय फलटण तालुक्यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्या मुळे पुन्हा नक्की कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणजे काय ?, कंटेनमेंट झोनमध्ये (Containment Zone) काय करावं ? असे प्रश्न पुन्हा उपस्थित राहत आहेत.

  1. कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणजे काय ?
    ज्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे, त्या घराला एपिसेंटर (किंवा मध्यवर्ती) मानून त्याच्या आसपासचा परिसर सील केला जातो. यालाच कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हटलं जातं. Contain करणं म्हणजे एखाद्या गोष्टीला आवर किंवा आळा घालणं. शहरी भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे, अशी इमारत, मोहल्ला, चाळ, चौक किंवा नगरपालिका वॉर्ड सील केला जाऊ शकतो. ग्रामीण भागात गाव, आसपासची काही गावं, ग्रामपंचायत, एकापेक्षा जास्त पोलीस स्टेशनचा समूह, असं क्षेत्र गरजेनुसार सील केलं जाऊ शकतं.
  2. कंटेनमेंट झोन (Containment Zone) मध्ये काय करावं ?
    कंटेनमेंट झोन (Containment Zone) मध्ये कोणत्या गोष्टी प्रशासनानं करणं आवश्यक आहेत, हेही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात सांगितलंय.
    १. आशा, अंगणवाडी आणि एएनएम सेविकांमध्ये हा परिसर विभागून द्यावा. प्रत्येकाने कमीत कमी 50 घरांची तपासणी करावी.
    २. कुटुंबातील सदस्य आणि लक्षणं असलेल्यांची यादी तयार करावी.
    ३. वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे तपासणी होईपर्यंत लक्षणं असलेल्या व्यक्तीला घरात आयसोलेट करावं.
    ४. मागील 14 दिवसात श्वसनाचे आजार असलेल्यांची पुन्हा तपासणी करावी.
  3. सीमा नियंत्रण – तपासणी शिवाय कंटेनमेंट झोन (Containment Zone) मधून कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाण्याची परवानगी नाही. बाहेरून ये भागात येणाऱ्यांची चौकशी केली जाईल. त्यांना योग्य काळजी घेण्याची माहिती दिली जाईल.


Back to top button
Don`t copy text!