वेतनवाढीसाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२३ | सातारा |
नायब तहसीलदार राजपत्रित अधिकारी वर्ग २ यांची वेतनश्रेणी वाढण्याच्या मागणीसाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने दि. ५ रोजी एकदिवसीय रजा आंदोलन, दि. १८ रोजी जिल्हास्तरावर दोन तास धरणे आंदोलन तर दि. २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत संघटनेच्या दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नायब तहसीलदार राजपत्रित अधिकारी वर्ग २ यांची वेतनश्रेणीत सुधारणा करावी, या मागणीसाठी ३ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान कामबंद आंदोलन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर आंदोलन स्थगित केले; परंतु आजअखेर वरिष्ठ स्तरावरून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने बैठक घेवून पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. चार टप्प्यात हे आंदोलन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दि. २९ रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. दुसर्‍या टप्प्यात दि. ५ रोजी एकदिवसीय रजा आंदोलन आणि सर्व आयुक्त कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तिसर्‍या टप्प्यात दि. १८ रोजी शासनास स्मरणपत्र देणे व जिल्हास्तरावर दोन तास आंदोलन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तर दि. २८ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!