कराडात भरदिवसा युवकाचा चाकूने वार करून खून

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२३ | सातारा |
कराड येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा एका युवकावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात युवक ठार झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर संशयित हल्लेखोर फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शुभम रवींद्र चव्हाण (वय २२, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोराने शुभम चव्हाण याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच शुभमचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. खुनाचे कारण समजू शकले नसले तरी हल्लेखारोच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!