उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वाखरी गावचा विकास करणार

माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांचे प्रतिपादन


दैनिक स्थैर्य । 25 जून 2025 । फलटण । कै. नाथ नाना असल्यापासून वाखरी गावातील ग्रामस्थांनी प्रेम केले. राजकारणात वेळोवेळी साथ दिली म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिटणीस पदापर्यंत पोहोचू शकलो. वाखरी भागातील कामे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या भागात ताकद वाढण्यासाठीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर चिटणीस पदाची जबाबदारी दिली, असे प्रतिपादन माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांनी केले.

वाखरी, ता. फलटण गावचे सुपुत्र माजी पंचायत समिती सभापती रामभाऊ ढेवळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी त्यांचा वाखरी ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

रामभाऊ ढेकळे म्हणाले, मला वाखरी गावचा विकास व राष्ट्रवादी काँग्रेचे या भागात काम करण्यासाठी अजित दादा यांनी संधी दिली आहे. या मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे काम वाखरी येथे पक्षाच्या माध्यमातून करणार आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस पद मिळण्यासाठी ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील व श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी सहकार्य केले आहे. भविष्यात या भागात पक्षाची ताकद वाढवून अजित दादांचे विचार सर्वत्र राबविणार आहे.

वाखरी येथील हायस्कूल इमारतीचा प्रश्न, वाखरी येथील पानंद रस्ते, छोटी मोठी प्रलंबित कामे अजितदादा यांच्याकडून करवून घेणार आहे. या भागातील युवकांनी मला साथ. नक्कीच मी विकासाच्या बाबतीत कोठेही कमी करणार नाही, अशी ग्वाही दिली. वाखरी ग्रामस्थ, सेवानिवृत्त सेवा संघटनेच्यावतीने माझा गौरव केला. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच रामचंद्र ढेकळे यांच्या हस्ते रामभाऊ ढेकळे यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त सेवा संघटनेच्यावतीने रामभाऊ ढेकळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैभव धायगुडे, दत्तात्रय मोहिते, कृष्णात कुंभार, बाळासाहेब गरुड आदींची भाषणे झाली. कृष्णात कुंभार यांनी प्रास्ताविक व आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!