
दैनिक स्थैर्य । 5 जून 2025। बारामती । विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ( व्हीपीकेबी आयईटी ), बारामती या महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखांच्या मूल्यांकन प्रक्रियेत एनबीए कडून पुनर्मान्यता प्राप्त झाले असून त्याचा कालावधी 2025 पासून पुढील तीन वर्षासाठीचा असणार आहे.
दिनांक 10 मे 2025 रोजी एनबीएच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला भेट देऊन महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि भौतिक सुविधांचे सखोल मूल्यांकन केले. या मूल्यांकनामध्ये अभ्यासक्रम रचना, अध्ययन-प्रक्रिया, प्राध्यापक व कर्मचारी गुणवत्ता, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, वसतिगृह सुविधा, आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागाला व उद्योगजगतातील सुसंगतीला देखील विशेष महत्त्व देण्यात आले. ही मान्यता तीन वर्षांसाठी प्रभावी असून, ती संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेची अधिकृत ओळख आहे.
महाविद्यालयाला यापूर्वीच नॅक अ + दर्जा आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. आता एनबीए, नवी दिल्लीकडून झालेल्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या दोन शाखांच्या पुनर्मान्यतेमुळे महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यामुळे व्हीपीकेबीआईटीच्या शैक्षणिक गुणवत्ता व्यवस्थेला अधिकृत मान्यता मिळाली असून, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औद्योगिक संस्थांमध्ये नोकरीच्या संधी, इंटरनशिप्स, तसेच विदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी विशेष प्रतिष्ठा लाभणार आहे.
या यशामध्ये संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. ज्ञानकमल छाजेड, यांत्रिक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. मनीषा लांडे, एनबीए समन्वयक डॉ. विपीन गावंडे, सौ. सुषमा नांदगावकर यांच्यासह सर्वच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचार्यांचे मोलाचे योगदान आहे.
ा यशामागे संस्थेचे विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, तसेच विश्वस्त डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, किरण गुजर, कर्नल श्रीश कंभोज यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी या यशाबद्दल सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. इतर शाखांनाही लवकरच एनबीए मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच, संस्थेचा उद्देश रूरल टू ग्लोबल ही संकल्पना सत्यात उतरविण्याचा प्रत्यन असल्याचे सांगितले