मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा – मोनिका सिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२४ | फलटण |
भारत निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये मतदान करणेबाबत जनजागृतीचे विविध उपक्रम सुरू आहेत. माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये मतदान जनजागृतीनिमित्त विविध उपक्रम रबविण्यात येत आहेत. सजाई गार्डन येथे केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षणप्रसंगी येथे स्वीप अंतर्गत ‘संकल्प आमचा १०० टक्के मतदानाचा’ या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते स्वाक्षरी करून करण्यात आला.

यावेळी तहसीलदार अभिजित जाधव तसेच इतर मान्यवर यांची उपस्थिती होती. तहसीलदार कार्यालय फलटण परिसरामध्ये स्वाक्षरी मोहीम फ्लेक्स बोर्ड मतदारांना स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी फलटण तालुक्यातून नागरिक कामानिमित्त येत असल्यामुळे या स्वाक्षरी मोहीमेमुळे मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मदत होणार आहे.

श्रीराम बझार, फलटण येथे स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती मोहीम प्रसंगी मतदार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी ‘उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा’ यामध्ये सहभागी होऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत तसेच मतदान केल्यानंतर सेल्फी फोटो शेर करून इतर लोकांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करणेबाबत मोनिका सिंह यांनी आवाहन केले व नागरिकांना जागरूकतेने मतदान करण्याची शपथ दिली.

यावेळी स्विप सहाय्यक अधिकारी फलटण सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शबाना बागवान निवडणूक नायब तहसीलदार, श्री. एस. के. कुंभार स्वीप नोडल ऑफिसर, शहाजी शिंदे पथकप्रमुख, श्री. लक्ष्मण अहिवळे तलाठी तसेच स्वीप टीम उपस्थित होती.


Back to top button
Don`t copy text!