राजाळे आणि सोनगाव बंगला येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप; क्रीडागुणांना मिळणार प्रोत्साहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी राजाळे सर्कल व सोनगाव बंगला येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही प्रगती करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडीचे माजी मुख्याध्यापक विठ्ठल निकाळजे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजाळे सर्कलमधील शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनगाव बंगला येथील विद्यार्थ्यांसाठी एकूण २९ स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले.

क्रीडा साहित्याचे वितरण व मार्गदर्शन

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आगामी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत होणार असून त्यांच्यात खिलाडूवृत्ती आणि सांघिक भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमासाठी फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मठपती, राजाळे केंद्राचे केंद्रप्रमुख बबनराव निकाळजे, राहुल पाटील, धर्मराज लांडगे, राजेश निकाळजे, ग्रामविकास अधिकारी राऊत, थोरात, संदीप पिंगळे आणि मुख्याध्यापक धनाजी मोरे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या क्रीडाविषयक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!