सोनगाव येथील ऐतिहासिक वेताळबाबा परिसराची ग्रामस्थांकडून स्वच्छता


स्थैर्य, सोनगाव, दि. ९ : फलटण तालुक्यातील सोनगाव येथे ऐतिहासिक वेताळबाबा परिसराची स्वच्छता सोनगाव ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. सोनगाव येथील सुमारे ५० ग्रामस्थांनी वेताळबाबा परिसराची स्वच्छता करण्यात आली. सोनगाव ता. फलटणचे नवनिर्वाचित सरपंच यांच्या हस्ते नारळ फोडून सुरवात केली. व ह्या उपक्रमास ग्रामस्थांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. लहान मुलांपासून थोर मंडळीपर्यंत सर्वानी हिरीनेने सहभाग घेऊन स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला.

स्वच्छता मोहिमेच्या सुरवातीला सरपंच रमेश जगताप, तानाजी जगताप, प्रा. राजेश निकाळजे व माजी सरपंच पोपटराव बुरुंगले यांनी सर्व उपस्थित युवकांना शुभेच्छा देऊन श्रमदान करून सहभाग सुद्धा नोंदविला.


Back to top button
Don`t copy text!