
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 24 डिसेंबर 2023 | फलटण | येथील सुप्रसिद्ध ‘रुपाली भेळ सेंटर’ चे मालक व सणगर गल्ली (शुक्रवार पेठ) येथील रहिवासी विक्रम गोपीनाथ हाडके (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने आज दि.२४ रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. येथील युवक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणेश हाडके यांचे ते वडील होते. सुमारे ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या भेळ व्यवसायामुळे ते फलटण शहरात सुपरिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ४ मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी ४:०० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


