विद्यावैभव प्रकाशनच्या पुस्तकांचा २२ जानेवारीला प्रकाशन सोहळा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण येथील विद्यावैभव प्रकाशनच्या ‘श्वास रामनामाचा | ध्यास महाराजांचा ॥’ (लेखिका सौ. दिलीप आलेकरी, सातारा) व ‘॥ ॐ साई महिमा ॥ (काव्यरूपी, लेखिका सौ. विद्या महेश मलवडकर (विद्याराणी))’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता डॉ. जोशी हॉस्पिटल, ३ रा मजला सभागृह, फलटण येथे संपन्न होत आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक विद्यावाचस्पती लक्ष्मीकांत जोशी उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रसाद जोशी असणार आहेत.

याप्रसंगी पुणे येथे गायक श्री. वरुण पानसे हे गीत रामायणातील निवडक गाणी सादर करणार असून यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. बकुल पराडकर यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!