
थेट WhatsApp वर मिळवा
विडणी (ता. फलटण) येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीच्या वतीने १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थैर्य, विडणी, दि. १२ ऑक्टोबर : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून विडणी (ता. फलटण) येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार, १६ ऑक्टोबर ते सोमवार, १९ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दांडिया स्पर्धा आणि पारंपरिक गोंधळ
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, गाव पूल परिसरातील महात्मा फुले चौकाजवळील आई तुळजाभवानी मंदिरात दररोज सायंकाळी आठ वाजता हे कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये १६ ऑक्टोबर रोजी देवीचा पारंपरिक गोंधळ होईल. १७ ऑक्टोबरला गावातील महिलांसाठी मोफत स्टाईल दांडिया, १८ ऑक्टोबरला दांडिया सोलो (कपल) स्पर्धा आणि १९ ऑक्टोबरला ग्रुप दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांसाठी विविध बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
भाविकांना भक्तीसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा आणि गावातील महिला व तरुणांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने या उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षा अमृता अभंग, पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, सरपंच सागर अभंग आणि उपसरपंच मनिषा नाळे यांच्यासह आयोजकांनी नागरिकांना या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





