
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
विडणी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच सागर अभंग यांच्या पुढाकाराने विडणी गावांमध्ये विविध कार्यक्रम हे नेहमीच आयोजित केले जातात. दरम्यान, सरपंच अभंग यांनी विडणी ग्रामपंचायत गणेशोत्सव मंडळाची सर्व सूत्रे महिलांच्या हाती देऊन यथोचित सन्मान केला आहे.
यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सरपंच सागर अभंग यांनी विडणी ग्रामपंचायत गणेशोत्सव मंडळाचे सर्व सूत्रे ही महिलांच्या हाती देऊन एक अनोखा पायंडा पाडला आहे. यामधून त्यांनी एक संदेश देत तालुका नव्हे तर जिल्ह्यापुढे एक आदर्श ठेवला आहे.
माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामध्ये विडणी गावचे सरपंच सागर अभंग कार्यरत आहेत.
