विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फलटण दौऱ्यावर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२४ | फलटण | महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उद्या दि. 29 फेब्रुवारी रोजी फलटण दौऱ्यावर येत आहेत. फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या विवाह निमित्त राहुल नार्वेकर हे फलटण दौऱ्यावर येत आहेत.

दि. 29 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी फलटण विमानतळ येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर ते हॉटेल जॅक्सन ईन्स येथे जाणार असून त्यानंतर सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी मुधोजी मनमोहन राजवाडा येथे लग्न समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.

दि. 1 मार्च रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी फलटण विमानतळ येथून राजभवन मुंबईकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मार्गस्थ होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!