शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ; अखेर राज्य शासनाकडून मानधनवाढीचा शासन निर्णय जारी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील हजारो शिक्षण सेवकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षण सेवकांच्या मानधनात राज्य शासनाकडून अखेर घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १४ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्यातील प्रायमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे महागाईच्या काळात आर्थिक विवंचनेत असलेल्या शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या मानधनाची रक्कम आता सुधारित दराने मिळणार आहे.

मानधनात दुप्पट ते तिप्पट वाढ

पूर्वी शिक्षण सेवकांना मिळणारे मानधन अत्यंत अपुरे असल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता. शासनाच्या या नवीन आदेशानुसार आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. सुधारित रचनेनुसार शिक्षण सेवकांना आता दरमहा सुधारित मानधन मिळणार असून, यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक संघटनांकडून व्यक्त होत आहे.

शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण

शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो शिक्षण सेवकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत असून, वेतनातील या वाढीमुळे त्यांचा उदरनिर्वाह अधिक सुलभ होईल. लवकरच संबंधित सर्व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत सुधारित मानधन वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनांना दिले जाणार आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!