दिल्लीत सुवर्णवेध! राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विडणीच्या श्रीनिधी अभंगचा डंका; संपूर्ण तालुक्यात कौतुक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिल्लीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील ३६ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावून विडणीच्या श्रीनिधी अभंग हिने चमकदार कामगिरी केली.

स्थैर्य, विडणी, दि. ०४ नोव्हेंबर : दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत फलटण तालुक्यातील विडणी येथील उद्योन्मुख कुस्तीपटू श्रीनिधी निखिल अभंग हिने सुवर्णपदक पटकावत मोठे यश मिळवले आहे. १४ वर्षे वयोगटातील ३६ किलो वजनगटात सहभागी झालेल्या श्रीनिधीने सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळवत हे ऐतिहासिक सुवर्णपदक स्वतःच्या नावे केले.

दमदार कामगिरी आणि कुस्तीचा वारसा

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत श्रीनिधीने जिद्द, आत्मविश्वास आणि कौशल्याच्या जोरावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिचे हे यश नवीन खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. श्रीनिधी ही प्रसिद्ध कुस्तीपटू तानाजी महाराज अभंग यांची नात असून पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे निखिल अभंग यांची कन्या आहे. कुस्तीचा समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबातील श्रीनिधीने या यशाद्वारे आपल्या मेहनतीची आणि जिद्दीची मोहोर उमटवली आहे.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव

श्रीनिधीच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विडणीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, भैरवनाथ तालीम मंडळ तसेच फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!