महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप मोहिमेत फलटण तालुका अव्वल, कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्र शासनाच्या महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमात सासकल येथील कृषी सेवारत्न तथा सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी करत फलटण तालुक्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला आहे.

स्थैर्य, सासकल, दि. ०२ ऑक्टोबर : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्ज संकलन, ग्रामसभेची मान्यता आणि प्रमाणपत्र वितरणाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सासकल येथील कृषी सेवारत्न तथा सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांचा तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. या उपक्रमात त्यांनी फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

उल्लेखनीय अर्ज संकलन आणि ग्रामसभा मान्यता

सचिन जाधव यांनी सासकल येथे ४१२, तर महाराष्ट्र राज्यातील पहिले ‘फळांचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या धुमाळवाडी येथे २९९ असे एकूण ७११ महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्ज संकलित केले. या अर्जांना २ ऑक्टोबर रोजी आयोजित ग्रामसभांमध्ये मान्यता मिळवून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देणे, शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी सक्षम करणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे या उद्देशाने त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची कृषी विभागाने दखल घेतली आहे.

मान्यवरांकडून कौतुक आणि अभिनंदन

या उत्कृष्ट कामाबद्दल सचिन जाधव यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा अजय शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी विडणी अजित सोनवलकर तसेच कृषी विभागासह परिसरातील शेतकरी वर्गाकडून अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!