रासपच्या फलटण तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी ह. भ. प. निकिता सूळ


दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । फलटण । राष्रीय समाज पक्ष फलटण तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी ह. भ. प. कु. निकिता सूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आघाडी अध्यक्ष सौ. निशा माने यांनी सदर निवड जाहीर केली.

तसेच रावडी खुर्द गावचे सागर गायकवाड यांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी रासपचे संतोष ठोंबरे, फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ, तरडगाव जिल्हा परिषद गट प्रमुख नितीन सुळ, पाडेगाव गण प्रमुख वैभव नरुटे, तरडगाव गण प्रमुख दादा केसकर, मोर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष कालिदास चोरमले, सौ. शीतल महादेव कुलाळ, सौ. उज्वला मारूती शेंडगे, सौ. संध्या हनुमंत कुलाळ, सौ. लता तनाजी कुलाळ, सौ. संगीता बापुराव कुलाळ, सौ. ऋषाली आधीनाथ कुलाळ, मालन सर्जेराव कुलाळ, दादा डोंबाळे, बाळासो सुळ, संजय कुलाळ, मयूर कुलाळ, बिराजी कुलाळ, संपत कुलाळ, रणजीत कुलाळ, गणेश कुलाळ, तात्याबा कुलाळ, बीराजी कुलाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!