चारुदत्त आफळेंना वीर जीवा महाले पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, वाई, दि.२२: येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने शिवप्रताप दिनानिमित्त देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे (पुणे) यांना या वर्षीचा “वीर जिवा महाले’ पुरस्कार, तर अभिवक्ता पंताजीकाका बोकील पुरस्कार गोरक्षक ऍड. कपिल राठोड (पुणे) यांना देण्यात येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण कार्यक्रम अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध केला. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून, तसेच वाईनगरीचा अफजलखानाच्या विळख्यातून मुक्त केल्याबद्दल समितीच्या वतीने मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार शिवप्रताप दिनी पुरस्कार वितरण न करता 15 मे 2021 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होईल. या वेळी शिवव्याख्याते हभप राकेश पिंजण (उरळी देवाची) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी शाहीर शरद यादव (दरेवाडी- बावधन) यांचा अफजलखान वधाचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार असल्याचे समितीने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!