दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | बारामती |
स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धा ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान नागपूर येथे पार पडल्या. या स्पर्धा ळपींशश्रश्रशर्लीींरश्र वळीरलळश्रळीूं असणारे विशेष विद्यार्थी विविध वैयक्तिक व सांघिक क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये बारामतीच्या वरदा कुलकर्णी हिने स्वीमिंग या प्रकारात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तिने १६ ते २१ वयोगट मध्ये ५० मीटर व २५ मीटर फ्री स्टाईल या प्रकारात राज्यात प्रथम येत गोल्ड मेडल मिळविले.
वरदाच्या या यशामुळे तिने पुणे जिल्हा व बारामतीचे नाव पुन्हा राज्य पातळीवर चमकविले आहे. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण २८ जिल्हे सहभागी झाले होते. तिची निवड राष्ट्रीय पातळीवर होणार्या पुढील स्पर्धेसाठी झाली आहे.
वरदा ही बाल कल्याण केंद्र कसबा, बारामती या शाळेची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशामुळे शाळेचे अधक्ष डॉ. अनिल मोकाशी, खजिनदार डॉ. माधुरी मोकाशी, सचिव मुळीक, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मुळे, क्रिडा शिक्षक श्री. चंना यांनी तिचे कौतुक केले.
वरदा ही आमच्या शाळेची यशस्वी विद्यार्थिनी आहे व ती शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवरही चमकावेल, अशी अपेक्षा डॉ. मोकाशी यांनी व्यक्त केली.
वरदा हिने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. मागील वर्षी दिव्यांग विभाग व समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन या स्पर्धांमध्येही ती राज्यात प्रथम आलेली होती. विविध समुद्र जलतरण स्पर्धांमध्ये तिने १ किलो मीटर आंतर पार करून पारितोषिक प्राप्त केले आहे. ती वीर सावरकर जलतरण तलाव येथे प्रशिक्षण घेत आहे. जलतरण तलावचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, सचिव विश्वास शेळके व सर्व संचालक मंडळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.