दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी आसनगावातील महिलांना ‘पपई जॅम’ बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमांतर्गत आसनगाव, ता. कोरेगाव येथे प्रशिक्षणाच्या अंतर्गत घरगुती पद्धतीने फळांपासून जॅम कसे बनविण्यात येते व व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचे उत्पादन कसे घ्यायचे, यावर विद्यार्थ्यांनी माहिती दिली. गावातील महिला व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीषा पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत शुभम मोरे, विजय नाळे, सिद्धांत फडतरे, अनिकेत मदने, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक खोसे, अजिंक्य मोरे या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.