फलटणमध्ये ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास सांगता सोहळा उत्साहात संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भारतीय बौद्ध महासभेच्या फलटण तालुका शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता सोहळा कोळकी येथील बुद्धविहारात उत्साहात पार पडला.

स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑक्टोबर : भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेच्या वतीने वर्षावास काळात ५६ गावांमध्ये ३२ विषयांवर राबविण्यात आलेल्या प्रवचन मालिकेचा सांगता सोहळा रविवारी कोळकी येथील बुद्धविहारात मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. नियोजनबद्ध पद्धतीने गावागावांत धम्मविचार पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

सांगता सोहळ्याची सुरुवात व मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता पंचरंगी धम्मध्वजाला सलामी देऊन ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्तुती, भीमस्मरण व स्तवन करण्यात आले. तालुकाध्यक्ष भीमराव लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते, राज्य हिशोब तपासणीस अरुण गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता गायकवाड, जिल्हा संघटक अर्जुन ननावरे, संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीमंतराव घोरपडे, माजी प्राचार्य शिवाजी सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. प्रभुदास मेश्राम, महिला तालुकाध्यक्षा रंजना रणवरे आणि संस्कार विभागाचे उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे यांच्यासह विविध ग्रामशाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धम्मकार्य प्रत्यक्ष गावांमध्ये दिसले पाहिजे – दादासाहेब भोसले

भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक, सातारा व पुणे जिल्हा प्रभारी तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर दादासाहेब भोसले यांनी वर्षावास प्रवचन मालिका यशस्वीपणे राबविल्याबद्दल फलटण तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले. मात्र, वर्षावास काळात ५२ गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले असले, तरी आता त्या गावांमध्ये प्रत्यक्ष शाखा स्थापन करून शाखेचे नियुक्तीपत्र व फलक लावण्याच्या दिशेने काम झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ प्रवचन घेऊन थांबण्याऐवजी त्या त्या शाखांमध्ये नियमित धम्मप्रवचन, विविध शिबिरे आणि समता सैनिक दलाचे सैनिकी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक काम कागदावर आणि प्रत्यक्षात दिसले पाहिजे, तरच मिशन २५ यशस्वी होईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!