फलटण फेस्टिव्हल: ‘होम मिनिस्टर’ शो मध्ये पूजा म्हेत्रेंनी जिंकली पैठणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजित फलटण फेस्टिव्हलच्या ‘होम मिनिस्टर’ शो मध्ये पूजा म्हेत्रे पैठणीच्या मानकरी ठरल्या. संध्या गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. अभिनेते रमेश परळीकर यांच्या निवेदनाने या कार्यक्रमात मोठी रंगत आली.

स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑक्टोबर : श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ च्या तिसऱ्या दिवशी झालेल्या ‘होम मिनिस्टर पैठणी शो’ ला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. या चुरशीच्या स्पर्धेत पूजा म्हेत्रे यांनी पैठणी साडी जिंकण्याचा बहुमान पटकावला, तर संध्या गायकवाड या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

विविध मान्यवरांची उपस्थिती

या विशेष कार्यक्रमाला प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी आणि ए. बी. ज्वेलर्सच्या संचालिका सारिका शहाणे उपस्थित होत्या. तसेच स्वयंसिद्धा उद्योग समूहाच्या अध्यक्षा मधुबाला भोसले, फलटणच्या उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, मृणालिनी भोसले, राजस भोईटे, ऐश्वर्या नाईक निंबाळकर, मयुरा गांधी, नगरसेविका रुपाली सस्ते, सुपर्णा आहिवळे, अनुराधा गोडसे आणि स्वाती फुले आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

रमेश परळीकरांच्या निवेदनाने वाढली रंगत

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी चित्रपट अभिनेते रमेश परळीकर यांनी केले. त्यांच्या विनोदी सादरीकरणामुळे कार्यक्रमात मोठी रंगत आली. तळ्यात मळ्यात, फास्ट फिंगर, झटपट उत्तरे आणि उखाणे यांसारख्या विविध खेळांमुळे उपस्थित महिलांचा उत्साह वाढला. या स्पर्धेतील पहिल्या दहा विजेत्या स्पर्धकांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!