फलटण बाजार समितीत लाल आणि गरवा कांद्याची आवक, सरासरी ४३०० रुपयांपर्यंत दर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून, लाल आणि गरवा कांद्याला चांगला दर मिळाला आहे. बाजार समितीत १०३३ क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली.

स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑक्टोबर : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. २७) कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. मुख्य बाजार समितीत लाल आणि गरवा कांद्याला शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला असून, सरासरी दर साडेचार हजार रुपयांच्या आसपास राहिला आहे.

लाल आणि गरवा कांद्याचे बाजारभाव

बाजार समितीत लाल कांद्याची आवक होऊन त्याला किमान २५०० रुपये, कमाल ६००० रुपये आणि सरासरी ४३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच गरवा कांद्याला किमान २५०० रुपये, कमाल ५२00 रुपये आणि सरासरी ४४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. या बाजारपेठेत एकूण १०३३ क्विंटल म्हणजेच २०६६ पिशव्या कांद्याची आवक झाली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!