वडूज : बाहेर पडू नका, पोलिसांकडून नाकाबंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई


स्थैर्य, वडूज, दि. ०४ : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वडूज पोलिसांकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. वडूज शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांकडे विचारपूस करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय विनाकारण भटकंती करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाईवर भर देण्यात आला आहे.

दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांकडूनही विनाकारण बाहेर फिरणे बंद करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. नियम तोडणाऱ्या दुकानांवर वडूज नगरपंचातीच्या प्रशासनाच्या वतीने कारवाई करत असल्याचे दिसत आहे. वडूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांची वाहनांतून पेट्रोलिंग करण्यात येत आहे. वाढत असलेल्या कोरोनामुळे सातारचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.


Back to top button
Don`t copy text!