
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील गणेश (मंदिर) सभा मंडपात कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, उद्योजक दिगंबर आगवणे, फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, फलटण तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ताजुभाई बागवान, शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, सामजिक कार्यकर्ते शंकरराव मुळीक, शंकर ऊर्फ बंडुशेठ कदम, सोमनाथ रासकर, डॉ.योगेश गांधी व बारवबाग गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
