
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, औंध, दि.२२: दुष्काळी भागाची वरदायिनी असणाऱ्या उरमोडीचे पाणी आजपासून खटाव तालुक्यात आले असून शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे फॉर्म भरून द्या असे आवाहन काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी रणजितसिंह देशमुख यांचेकडे केली होती,त्यांनतर देशमुख यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली करून लवकर पाणी सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी लावून धरली होती,दि. 20 रोजी पाणी सोडण्यात आले असून खटाव तालुक्यात पाणी पोहचल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पिकांना पाणी देणे चालू असल्याने पाणीपातळी आता खालावली असून तालुक्यातील रब्बी हंगामासाठी पाणी येणे गरजेचे होते त्यासाठी शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते,आता पाणी आल्याने पिकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे, शेतकऱ्यांनी मागणी फॉर्म भरून द्यावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
