मागील 24 तासांपासून उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, मुंबई, दि.१७: अलीकडेच काँग्रेसला सोडचिठ्ठी
देत शिवसेनेत प्रवेश करणा-या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे
इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले आहे. 24 तास उलटून गेल्यानंतरही
त्यांचे अकाउंट रिकव्हर झालेले नाही. त्यांच्या अकाउटंवरील सर्व पोस्ट
डिलीट झालेल्या दिसत आहेत. उर्मिला यांनी बुधवारी याप्रकरणी मुंबई
पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या दुस-या
सोशल मीडिया प्रोफाइलच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली.

उर्मिला
यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्ट केली आहे. त्यात
त्यांनी म्हटले की, ‘माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले आहे.
सुरुवातीला ते थेट मेसेज करताना आणि काही स्टेप फॉलो करायला सांगतात. नंतर
ते अकाउंट व्हेरिफाय करतात आणि मग ते हॅक होते.’

आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये
उर्मिला पुढे म्हणाल्या की, सायबर क्राइमला कोणीही हलक्यात घेऊ नये. अकाउंट
हॅक झाल्याची अधिकृत तक्रार नोंदवली असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या
म्हणाल्या, ‘सायबर क्राइम ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे महिलांनी दुर्लक्ष
करता कामा नये. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी
पोलिसांकडे गेली असता, मी डीसीपी रश्मी करंदीकर यांना भेटले. त्यांनी मला
या गुन्ह्याशी संबंधीत बरीच माहिती दिली. भविष्यात यावर नक्कीच काम करेन.’

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!