उर्मिला मातोंडकरचा उद्या शिवसेनेत प्रवेश


 

स्थैर्य, मुंबई, दि.२९: प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिदीर्ची सुरुवात केली होती. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. 

आता उर्मिला मातोंडकर सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर हाती शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!