सुपरस्टार रजनीकांत यांची उद्या राजकारण प्रवेशाची घोषणा?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, चेन्नई, दि.२९: दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष रजनी मक्कल मंद्रमची एक महत्त्वाची बैठक सोमवारी होणार आहे. यानंतर रजनीकांत राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांचा क्रेझ चाहत्यांमध्ये नेहमीच पहायला मिळतो. रजनीकांत यांचे सिनेमे रिलीजपूर्वीच हिट होतात. यामागचे कारण म्हणजे संपूर्ण भारतात त्यांचा खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. ब-याच कालावधीपासून रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळते. अशात रजनीकांत ३० नोव्हेंबरला तमीळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ साठी मोठी घोषणा करू शकतात. 

रजनीकांत यांनी २०१७ साली डिसेंबरमध्ये घोषणा केली होती की तमीळनाडूमध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली, पण त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र यावेळी ते राजकारणात निश्चित प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!