कोरोनाच्या प्राश्वभूमीवर झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरु करा; फलटण तालुक्यातून मागणी


स्थैर्य, फलटण, दि. ०९ : सध्या जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये कोरोना म्हणजेच कोव्हीड १९ ह्या संसर्जन्य आजाराने आपले रौद्ररूप धारण केलेले आहे. तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फलटण गिरवी रोडवर असणारे ग्रामीण रुग्णालय व सांस्कृतिक भवनच्या मागे नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले कोरोना केअर सेंटर तातडीने सुरु करावी, अशी मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वगळता सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.

सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीत. रेमडीसीव्हर या उपयुक्त इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. अशा विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब खराडे, राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीर शेख, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास नाळे, प्रदीप झणझणे, विजय मायणे, भाजपा युवा मोर्चाचे नितीन जगताप, शशिकांत रणवरे, राष्ट्रीय काँग्रेसचे युवक अध्यक्ष प्रीतम जगदाळे, तात्याबा गायकवाड, मंगेश आवळे यांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.

येणाऱ्या काळामध्ये फलटण मध्ये उपलब्ध असणाऱ्या बेड्सची संख्या, उपलब्ध असणारा रक्तसाठा, रेमडीसीव्हर इंजक्शनचा साठा या बाबत प्रशाशनाने माहिती कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन सुरु करून कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड होणार नाही या कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे हि या वेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!