यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२४: केंद्रीय
लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला
आहे. परीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात निकालाची घोषणा यूपीएससीनं केली आहे.
विद्यार्थी हा निकाल ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकतात. आयोगाने यूपीएससी सीएस
पूर्व परीक्षा 2020 परीक्षेसह भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2020 चा
देखील निकाल जाहीर केला आहे.

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी 10 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं.
परीक्षा नियमांनुसार जे विद्यार्थी या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेत,
त्यांचा निकाल घोषित केला आहे. आता या विद्यार्थ्यांना यूपीएससी सिव्हिल
सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी विस्तृत फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म
यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वर 28 ऑक्टोबर 2020 ते 11 नोव्हेंबर 2020
च्या सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत विद्यार्थी भरु शकतील.

या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा 8
जानेवारी 2021 रोजी होणार आहे. यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2020
साठी अ‍ॅडमिट कार्ड आणि परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आधी 3-4 आठवडे
येण्याची शक्यता आहे.

जर विद्यार्थ्यांनी आपला पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी बदलला असेल तर
तशी माहिती आयोगाकडे देणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेची
अन्सर की, मार्क्स आणि कट ऑफ मार्क्स याची पूर्ण माहिती यूपीएससी सिव्हिल
सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल लागल्यानंतर देणार आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!