पोस्ट ऑफिसची दमदार योजना; ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर मिळणार घसघशीत व्याज अन् करसवलत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

बँकांच्या तुलनेत सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परताव्याचा शोध घेत असलेल्या नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट (TD) योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, यात ५ वर्षांच्या ठेवीवर ७.५ टक्के वार्षिक व्याजदर मिळत आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २७ ऑक्टोबर : सुरक्षित बचतीसोबतच निश्चित परतावा देणारी योजना म्हणून पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव (टाइम डिपॉझिट) योजनेला गुंतवणूकदारांकडून मोठी पसंती मिळत आहे. या योजनेत बँकांच्या एफडीच्या तुलनेत अधिक सुरक्षितता आणि उत्तम व्याजदर मिळत असल्याने सामान्यांचे आर्थिक नियोजन सोपे झाले आहे.

व्याजदर आणि गुंतवणुकीचे पर्याय

पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी टाईम डिपॉझिट खाते उघडता येते. सध्याच्या नियमांनुसार १ वर्षाच्या ठेवीवर ६.९ टक्के, २ वर्षांसाठी ७.० टक्के, ३ वर्षांसाठी ७.१ टक्के तर ५ वर्षांच्या ठेवीवर सर्वाधिक ७.५ टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. या योजनेत किमान १ हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते, तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

करसवलतीचा मोठा फायदा

५ वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर बचतीचा लाभ मिळतो. तसेच, मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना नियमांनुसार रक्कम वाढवण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जातो. कमी जोखमीमध्ये शाश्वत परतावा हवा असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरत आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!