स्थैर्य, सातारा, दि.१० : कोयना धरणाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवार) सातारा जिल्हा दौऱ्यावर आले हाेते. त्यांच्यासमवेत खासदार श्रीनिवास पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकारमंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मिलींद नार्वेकर उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने कोयनानगर येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी कोयना धरणाची पाहणी केली. कोयना धरणावरील पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांना काेयना प्रकल्पाच्या अधिका-यांनी धरण व्यवस्थापन आणि जलविद्युत प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना काेयना धरणाच्या प्रतिकृतीची अधिकारी आणि मान्यवरांनी भेट दिली.