अवकाळी पावसाने मांढरदेव घाटात दरडी कोसळल्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 26 मे 2025। सातारा। मांढरदेव (ता वाई)परिसरामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. यामुळे वाई ते मांढरदेव रस्त्यावरील घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे वाहनचालकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान दरडी कोसळल्यानंतर बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून रस्ता मोकळा केला.

तीर्थक्षेत्र मांढरदेवला येणार्‍या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. त्यामुळे वाई ते मांढरदेव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, दोन वर्षे होवूनही हे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. या दोन्ही घाटांचे काम करत असताना रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणावरील डोंगर भाग तोडण्यात आलेला आहे. मात्र, काही ठिकाणी चुकीच्या पध्दतीने डोंगर फोडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली काम करत असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराकडून दरड न कोसळण्याची कोणतीच दक्षता घेतलेली नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मांढरदेव घाटात दरडी कोसळू लागल्या आहे. शुक्रवारी घाटात दरड कोसळली. या घटनेत कोणतीही वित्तहानी झाली नाही. घटनेनंतर बांधकाम विभागाने कोसळलेली दरड तातडीने हटवली.

Back to top button
Don`t copy text!