केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांचे डॉ. आंबेडकर स्मारकास अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जानेवारी २०२३ । फलटण । स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३९ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंगळवार पेठ, फलटण येथील भिमस्फुर्ती भूमी (शेरी) येथे भेट देवून प्रबोधन केले होते, त्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्वरुपात उभारण्यात आलेल्या बौद्ध विहारास भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी भेट देवून अभिवादन केले, त्यावेळी शाहू – फुले – आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजनेंतर्गत मिशन २०२४ ची सुरवात नुकतीच महाराष्ट्रात करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यामध्ये त्यांनी मंगळवार पेठ येथे भेट दिली.

ना. मिश्रा यांच्या समवेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य प्रवास संयोजक माजी मंत्री बाळा भेगडे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक दत्ता अहिवळे, सचिन अहिवळे, बी. टी. जगताप, विजय येवले, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, प्रशांत कोरेगावकर, अमोल सस्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!