१६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा मुधोजी महाविद्यालय मैदानावर सुरु

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । फलटण । श्रीमंत रामराजे क्रिकेट अकॅडमी आणि न्यू विजय क्रिकेट क्लब, फलटण यांच्या संयुक्त सहभागाने १६ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धा मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या मैदानावर सुरु झाल्या असून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते या स्पर्धांचे उदघाटन झाले. बीसीसीआय चे व्हिडिओ अनालायझर प्रधान सर अध्यक्षस्थानी होते.

या स्पर्धेत फलटण, बारामती, वालचंदनगर, भिगवण व सातारा येथील एकूण ८ संघ सहभागी झाले आहेत. न्यू विजय क्रिकेट क्लब, फलटणच्या संयोजनाने सुरु झालेल्या या स्पर्धांसाठी इस्माइल शेख सर, मिलिंद सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. स्पर्धेसाठी सोमनाथ चौधरी, मदने सर, मिलिंद चौधरी, फिरोज शेख, रवि दळवी आणि न्यू विजयचे सर्व खेळाडू यांनी परिश्रम घेतले आहेत.

Back to top button
Don`t copy text!