उदयनराजे यांची ओपन ऑडीतून सातारा सवारी; खासदार उदयनराजे यांचा पुन्हा हटके अंदाज


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. असाच काहीसा प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास पाहायला मिळाला. उदयनराजेंच्या एका चाहत्यांने आपल्या ओपन ऑडी कारमधून फेरफटका मारण्याची राजेंना विनंती केली. मग काय विनंतीला मान देऊन राजेंनी ऑडी कारमध्ये स्वार होत सातारा शहरामधून अर्धा तास फेरफटका मारला. यावेळी पाहणाऱ्या चाहत्यांनी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. राजेंच्या या हटके अंदाजाने शहरवासीयांना सुखद धक्का बसला. अनेकजण त्यांच्या या रपेटचा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेरामधून कैद करताना दिसत होते.


Back to top button
Don`t copy text!