सातार्‍यातील बोगदा परिसरात सराईत दुचाकीचोर जेरबंद; सातारा शहर पोलिसांची कामगिरी : तीन दुचाकी हस्तगत


 

स्थैर्य, सातारा, दि. ६: येथील बोगदा परिसरातून सराईत दुचाकी चोरट्यास सातारा शहर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून तीन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. संतोष बाळु शिंदे रा. लोणारवाडी, ता. पंढरपूर असे त्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, दि. 4 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक सातारा परीसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी बोगदा परीसरात कास रोडवर एकजण संशयीतरित्या मोटारसायकल घेवून थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथक त्याठिकाणी गेले असता तेथे संशयीत आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडील मोटारसायकलीबाबत चौकशी करुन कागदपत्रांची मागणी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल सातारा येथून चोरी केल्याचे सांगितले. यानंतर त्याला सातारा शहर पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करता त्याने आणखी 2 दुचाकी सातारा परीसरातून चोरी केल्याचे सांगितले. या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या. याप्रमाणे पथकाने अट्टल चोरास जेरबंद करुन त्याचेकडुन एकुण 3 दुचाकी जप्त केल्या आहेत. 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, पो.ना. अविनाश चव्हाण, सुनिल मोहिते, शिवाजी भिसे, पो.कॉ. गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल घुमाळ यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!