
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, सातारा, दि.०५: गोडोली, सातारा येथून शाळेसमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत भरत काशिनाथ खडतरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भरत खडतरे यांनी गोडोली येथील कल्याणी शाळेसमोर बजाज पल्सर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हवालदार मेचकर तपास करत आहेत.
