विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा 


स्थैर्य, सातारा, दि.०५: घरात केलेली कामे आवडत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहाजणांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सौ. प्रज्ञा हनुमान महामुलकर वय 23 यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पती हनुमान महामुलकर वय 32, सोपान तुकाराम महामूलकर वय 60, अंजना सोपान महामूलकर वय 55 सर्व रा. अहिरे कॉलनी, सातारा, पद्मा सुनील यादव वय 43 रा. शेरेवाडी, ता. सातारा, साधना शरद साळुंखे वय 40, वनिता उदय घोरपडे रा. भाडळे, ता. कोरेगाव आदींनी प्रज्ञा महमूलकर यांचा केलेली कामे आवडत नसल्याच्या कारणावरून जाचहाट केला. सासर करंजोशी, ता. जावली तसेच अहिरे कॉलनी नवीन एमआयडीसी येथे दि. 28 जून 2017 पासून 25 मे 2020 या दरम्यान त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार भोसले करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!