स्थैर्य, सातारा, दि.१८: वाढे फाटा, ता. जि. सातारा येथे तिघाजणांनी चाकूचा धाक दाखवून एका युवकाची मोटारसायकल पळवून नेली होती. याप्रक रणी सातारा तालुका डी.बी. पथकाने दोनजणांना जेरबंद केले आहे तर एका विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. विपूल तानाजी नलवडे वय 23, रा. करंजे सातारा, करण अमर भिसे वय 20 रा. दत्त कॉलनी म्हसवे रोड, सातारा अशी दोघा संशयितांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, दि. 15 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास वाढे फाटा, ता. जि. सातारा येथील ब्रीजपुढे एक युवक लघुशंकेसाठी थांबलेला होता. त्याठिकाणी अनोळखी तीन युवक आले. त्यांनी युवकास चाकूचा धाक दाखवून त्याची मोटारसायकल पळवून नेली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. सातारा यानंतर तालुका पोलीस ठाणेचे डी.बी. पथकाने घटनेबाबत माहिती घेवून तीन संशयितांना गोपनिय माहितीच्या आधारे ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडून गुन्हयातील मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे. तीन युवकांपैकी एक विधीसंघर्ष बालक आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सहा पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पो. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पो. उपनिरीक्षक अमीत पाटील डी.बी. पथकातील हवालदार दादा परिहार, पो. ना. सुजीत भोसले, पो. ना. निलेश जाधव, पो. कॉ. सागर निकम, पो.कॉ. सतीश पवार , पो.कॉ. समाधान बर्गे, पो.कॉ. कुडवे यांनी केलेली आहे.