भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांचा सातारा दौरा


स्थैर्य, सातारा, दि.१८: भाजपचे राष्ट्रीय चिटणीस पदी निवड झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्हा दौर्‍यावर आलेल्या विनोद तावडे यांचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त स्वागत केले. पश्‍चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. त्याठिकाणी महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळालेल्या तावडे यांनी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता निश्‍चित येईल, त्यासाठी सर्वतोपरी भाजप प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय चिटणीस झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आले. त्यांचे जिल्ह्यात भा.ज.पा. सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. सुवर्णाताई पाटील यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, जिल्हा सरचिटणीस सौ. मनीषा पांडे महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ. रीना भणगे, सरचिटणीस विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक सुनील काळेकर, नगरसेविका सौ. आशा पंडित, माजी नगरसेवक, किशोर पंडित, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, नितीन कदम, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, युवा मोर्चा  जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, शहराध्यक्ष विक्रम बोराटे, जिल्हा सरचिटणीस स्वप्नील बोराटे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुजित साबळे, सुधीर काकडे, भिमराव लोखंडे, बंडा पवार, आरोग्य सेवा समिती जिल्हाध्यक्ष विवेक कदम, अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. उत्कर्ष रेपाळ, अविनाश पवार, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष वैष्णवी कदम, महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा कुंजा खंदारे, व्यापारी आघाडी अध्यक्ष लक्ष्मण पटेल, जिल्हा चिटणीस रवी आपटे, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक पंकज चव्हाण, प्रदेश सहसंयोजक गीतांजली ठाकरे, वैशाली राजेघाडगे, दिपाली आंबेकर, हेमांगी जोशी, औद्योगिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, सातारा शहर महिला मोर्चा सरचिटणीस अश्‍विनी हुबळीकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बबलू सोळंकी, जिल्हा कार्यकारणी सदस्य निर्मलाताई पाटील आणि शहर, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!