
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २५ जून २०२४ | फलटण |
पवारवाडी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत सोमवार, २४ जून रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपानजीक हणमंतवाडी रस्त्याच्या पुलावर बाथरुमसाठी थांबलेल्या दोघांना एकाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच बिअरच्या बाटलीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यावेळी आरोपीने कारचेही नुकसान केल्याची फिर्याद शालिंदर तानाजी झेंडे (वय ३६, रा. मुंजवडी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या मारहाण प्रकरणी सोनू गंगाधर रणदिवे (रा. मुंजवडी, ता. फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो. हवा. ओंबासे करत आहेत.
