पाकिस्तानच्या दोन ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, श्रीनगर, दि.२१ :
जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या
बाजूनं दोन ड्रोन आल्याचं वृत्त एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
पाकिस्तानकडून आलेल्या दोन्ही ड्रोन्सनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली.
त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ड्रोनच्या दिशेनं गोळीबार सुरू
केला. या घटनेनंतर जवानांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून अधिक तपास
सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास
परिषदेच्या (डीडीसी) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
दहशतवादी कारवाया करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दहशतवादी आगामी जिल्हा विकास
परिषदेच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी हिंसक कारवाया करू शकतात, असं
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सोमवारीच म्हटलं होतं.
जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न सीमेपलीकडून केले
जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!