मिरढे येथे जमिनीच्या कारणावरून दोन गटात मारहाण; परस्परविरोधी फिर्यादी दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
मिरढे (ता. फलटण) येथे आज सकाळी ११.४५ वाजता दोन कुटुंबात असलेल्या जमिनीच्या वादावरून दोन गटात जबर मारहाण झाली. या मारहाण प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी सुमारे ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

विद्यमान दत्तात्रेय गावडे, प्रशांत ज्ञानदेव गावडे, प्रणव विकास गावडे, दत्तात्रेय नामदेव गावडे, सुशीला ज्ञानदेव गावडे, सुजाता दत्तात्रेय गावडे, सिताराम दगडू जाधव, गीताबाई दगडू जाधव, आशा सीताराम जाधव, नेहा अभिजीत जाधव, सतीश कृष्णात जाधव (सर्व रा. मिरढे, तालुका फलटण, जिल्हा सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या घटनेचा अधिक तपास पो.ह. चांगण व साबळे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!