
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । सातारा । येथील जुन्या औद्योगिक वसाहतीमधून रिकाम्या जागेत चरत असलेल्या 28 हजार रुपये किमतीच्या आठ शेळ्या चोरील्या प्रकरणीदोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेळ्या चोरीला गेल्याबाबत मंगल विश्वनाथ माने (रा. धनगरवाडी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. त्यामध्ये कर्हाड तालुक्यातील एकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. चोरीला गेलेल्या तीन शेळ्याही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी संशयीतांना अटक करण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून शेळ्या चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
