मलठण येथील हळदी-कुंकवाच्या विजेत्या महिलांना मानाची ओटी प्रदान


दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व मकर संक्रांतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आयोजित मलठण येथील हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमामधील उपस्थित महिलांमधून ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला आहे. त्यामधील स्वराजची मानाची ओटी राजश्री काकडे व भाग्यश्री निकाळजे यांना मिळाली.

या विजेत्यांना जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर, इंगवले वहिनी, सौ. मनिषा सचिन अहिवळे यांनी मंगळवार पेठेतील त्याच्या घरी जाऊन स्वराजची मानाची ओटी त्यांना बक्षीस म्हणून देण्यात आली.

यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!