
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०९ जानेवारी २०२२ । फलटण । वंचित बहुजन आघाडीच्या फलटण तालुकाध्यक्ष पदी तुकाराम गोविंद गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. यासोबतच उपाध्यक्ष पदी सुखदेव नानासो रणदिवे, सुरज तानाजी भोसले, युवक तालुका उपाध्यक्ष पदी अमोल रमेश लोंढे, संघटक अक्षय सदाशिव मोहिते यांची निवड सुध्दा करण्यात आलेली आहे.
शाहु, फुले, आंबेडकर विद्वत सभेसाठी महेश विलास जाधव, आविनाश भानुदास रणदिवे यांची निवड करण्यात आलेली आहे.
यावेळी दयानंद हरिभाऊ जगताप यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश करण्यास आला आहे. सदर कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
